GRAMIN SEARCH BANNER

भाट्ये समुद्रकिनारी धार्मिक विधीसाठीची शेड जमीनदोस्त; भर पावसात पिंडदानावेळी नागरिकांचे हाल !

भाट्ये ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष, दुरुस्त करण्याची मागणी

रत्नागिरी : भाट्ये येथील समुद्रकिनाऱ्यावर बांधलेली धार्मिक विधीसाठीची शेड जमीनदोस्त झाल्याने नागरिकांना पावसात अंत्यविधी आणि पिंडदान करावे लागत आहे. या स्थितीकडे ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केल्यामुळे मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना भर पावसात धार्मिक विधी करण्याची वेळ येत आहे.

या शेडचा वापर विशेषतः पावसाळ्यात अंत्यविधी व पिंडदानासाठी मोठ्या प्रमाणावर केला जात होता. किनाऱ्यालगत असलेल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कारानंतर पिंडदान विधी थेट समुद्राजवळ होतो. या वेळी शेड ही एकमेव सोय होती जी नागरिकांना पावसापासून संरक्षण देत असे. मात्र ती शेड नुकतीच जमीनदोस्त झाली असून सध्या नागरिकांना शेडच्या मागील उघड्यावर धार्मिक विधी करावे लागत आहेत.

या गंभीर समस्येकडे भाट्ये ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केले असून शेड दुरुस्त किंवा पुनर्बांधणीसाठी कोणतेही ठोस पाऊल उचलण्यात आलेली नाही. परिणामी, नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. “धार्मिक विधी ही श्रद्धेची बाब असून अशा वेळी ग्रामपंचायत प्रशासनाने किमान मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात,” अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.

ग्रामपंचायतीने त्वरित या प्रश्नात लक्ष घालून शेड दुरुस्त करावी आणि नागरिकांची होणारी गैरसोय थांबवावी अशी मागणी होत आहे.

Total Visitor Counter

2455436
Share This Article