GRAMIN SEARCH BANNER

पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून कोळंबे प्रशालेत विद्यार्थ्यांना पावसाळी भेट

संगमेश्वर/ दिनेश आंब्रे: महाराष्ट्र राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. उदय सामंत यांच्या माध्यमातून कोळंबे येथील श्रीमती पांडुरंग मुळये हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांना छत्री वाटपाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच विद्यार्थ्यांना मिळालेल्या या ‘पावसाळी भेटी’मुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता.
या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते श्री. अतीश पाटणे, श्री. प्रशांत मुळये, शिवसेना (शिंदे गट) शाखाप्रमुख नारायण चव्हाण, उपशाखाप्रमुख योगेश्वर कळंबटे यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र मुळये आणि सर्व शिक्षक उपस्थित होते.

यावेळी बोलताना श्री. अतीश पाटणे यांनी विद्यार्थ्यांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, “सामंत साहेब हे खऱ्या अर्थाने जनतेचे सेवक आहेत. त्यांच्या माध्यमातून जनतेच्या हिताच्या अनेक योजना राबवल्या जातात. मुलांनी शिक्षणात प्रामाणिकपणा आणि दर्जा राखावा, ही त्यांची मनापासूनची इच्छा आहे.” श्री. पाटणे यांच्या या शब्दांनी विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दल अधिक गांभीर्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र मुळये यांनी केले. त्यांनी सांगितले की, “अतीश पाटणे आणि प्रशांत मुळये हे आमच्या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत, याचा आम्हाला अभिमान आहे.” यामुळे शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा शाळेसोबतचा ऋणानुबंध दिसून आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रहाटे सरांनी केले, तर जोशी सरांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

Total Visitor Counter

2455426
Share This Article