GRAMIN SEARCH BANNER

संगमेश्वर: फणसटची सुकन्या अर्शिन धामस्कर हिचे दंतवैद्य (BDS) परिक्षेत उज्वल यश

Gramin Varta
328 Views

संगमेश्वर: संगमेश्वर तालुक्यातील फणसट गावाने एका गुणवान कन्येच्या यशाने आपला मान उंचावला आहे. फणसट गावची सुकन्या अर्शिन अस्लम धामस्कर हिने दंतवैद्य (BDS) पदवी परिक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. दमण येथील वैदिक डेंटल कॉलेज अँड रिसर्च सेंटर, दमण येथून तिने ही प्रतिष्ठित पदवी प्राप्त केली आहे. तिच्या या उज्ज्वल यशामुळे संपूर्ण संगमेश्वर तालुक्यातून तिच्यावर आणि तिच्या कुटुंबीयांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

डॉ. अर्शिन धामस्कर हिचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण देवरुखमध्ये झाले. तिने दहावीपर्यंतचे शिक्षण देवरुखच्या अरुंधती पाध्ये इंग्लिश मीडियम स्कुलमधून पूर्ण केले. त्यानंतर बारावी (विज्ञान शाखा) पर्यंतचे शिक्षण तिने कै. मिनाताई ठाकरे विद्यालयातून यशस्वीरित्या पूर्ण केले. शालेय जीवनापासूनच अभ्यासात हुशार असलेल्या अर्शिनने मेहनतीच्या जोरावर वैद्यकीय क्षेत्रात आपले स्थान निश्चित केले आहे.

कठीण BDS अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण करून डॉ. अर्शिनने आता दंतवैद्य म्हणून पदवी प्राप्त केली आहे. तिच्या या महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे आणि तालुक्यातील अनेक युवा पिढीसाठी ती एक प्रेरणास्रोत ठरली आहे.

Total Visitor Counter

3374944
Share This Article