रत्नागिरी: कोकणात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी गावागावातील वाडीवस्त्यात आलेल्या चाकरमान्यांनी दीड दिवस गणेश मूर्तीचे भक्तीभावाने पूजन केले. यानंतर कोकणवासीनी गुरूवार पासून परतीचा प्रवास सुरू केला.
श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यासाठी चाकरमानी कोकणातील प्रत्येक गावागावात वाढीवस्त्यात दाखल झाले होते. वाडी वस्तीतली बंद घरे गणेशोत्सवात उघडल्यामुळे गावे गजबजली आहेत. दरम्यान गुरूवारी दीड दिवसाच्या गणेशोत्सवाची सांगता झाली.
श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यासाठी चाकरमानी कोकणातील प्रत्येक गावागावात वाढीवस्त्यात दाखल झाले होते. वाडी वस्तीतली बंद घरे गणेशोत्सवात उघडल्यामुळे गावे गजबजली आहेत. दरम्यान गुरूवारी दीड दिवसाच्या गणेशोत्सवाची सांगता झाली. गणपती बाप्पा मोरया…. पुढच्या वर्षी लवकर या! या जयघोषात गुरूवारी रात्री उशिरापर्यंत या गणेशमूर्तीचे नदी, तलाव, समुद्र अश्या ठिकाणी विसर्जन करण्यात आले.
त्यानंतर शुक्रवार पासून मुंबईकर चाकरमानी परतीच्या वाटेला लागले. सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशनवर कोकण रेल्वे गणपती स्पेशल ट्रेन ने मुंबईला जाण्यासाठी गणेश भक्तांनी गर्दी केली होती. मुंबईवरून गावाकडे येणारे व गावाकडून मुंबईकडे जाणारे गणेश भक्त रेल्वे स्टेशनवर दाखल झाल्यामुळे रेल्वे स्टेशन परिसरात वर्दळ वाढली आहे.
दीड दिवसाचा गणेशोत्सव आटोपून कोकणवासी परतीच्या प्रवासाला!
