GRAMIN SEARCH BANNER

राजापूर : साखर नवलादेवी मंदिरात २२ सप्टेंबरला डबलबारी भजनाचा जंगी सामना

Gramin Varta
398 Views

मनोहर धुरी / राजापूर

तालुक्यातील चव्हाणवाडी येथील साखर नवलादेवी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त सोमवार, २२ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री १० वाजता भजन रसिकांसाठी खास डबलबारी भजनाचा मेळावा रंगणार आहे.

सिंधुदुर्गातील देवगड तालुक्यातील प्रसिद्ध भजनकार बुवा श्री. संदीप पुजारे व बुवा श्री. अखिलेश फालके यांच्यात २०-२० भजनाचा सामना होणार आहे. बतवणीच्या खास शैलीसाठी ओळखले जाणारे हे दोन्ही बुवा शेरास सव्वाशेर ठरणारी जुगलबंदी सादर करणार आहेत.

पखवाजाचा नाद, पेटीचे सूर, विनोदी बतवणी, अभंग, गौळणी आणि विविध शेलक्या गाणी यामुळे ही रात्र अविस्मरणीय ठरणार आहे. विठ्ठलनामाचा गजर आणि हरिनामाचा उत्सव यांचा रंगतदार ठेका भजन रसिकांना मनमुराद आनंद देणार आहे.

या डबलबारी भजनाचा आस्वाद घेण्यासाठी परिसरातील सर्व भजनप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Total Visitor Counter

3215240
Share This Article