दापोली : तालुक्यातील पात्री विसापूर येथे एका चालकाच्या घरासमोरून ४०,००० रुपये किमतीची बजाज पल्सर मोटारसायकल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. ही चोरी १० जुलै २०२५ रोजी रात्री ११:३० ते ११ जुलै २०२५ रोजी सकाळी ०७:३० च्या दरम्यान घडली. मुबीन हुसेन नांदगावकर (वय ३६, रा. पात्री विसापूर, ता. दापोली) यांनी दापोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
चोरट्याने फिर्यादीच्या संमतीशिवाय आणि लबाडीच्या इराद्याने (एम.एच.०८ ए.एन.५११८), काळ्या रंगाची, २०१७ मॉडेलची पल्सर मोटारसायकल चोरली आहे. गाडीचा चेसिस नंबर (D2A13EY2HCC48176) आणि इंजिन नंबर (DKYCHC26459) आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दापोलीत मोटारसायकलची चोरी, 40 हजारांचे नुकसान
