GRAMIN SEARCH BANNER

राजापूरचा निल कुडाळी आंतरराष्ट्रीय रॅपिड रेटिंगमध्ये चमकला; प्रांताधिकारी डॉ. जास्मिन शेख यांच्याकडून कौतुक

राजापूर: राजापूर तालुक्याचा ११ वर्षीय निल कुडाळी याने आंतरराष्ट्रीय रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत १४०८ गुण मिळवून आपले कौशल्य सिद्ध केले आहे. त्याच्या या यशामुळे राजापूरचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले असून, प्रांताधिकारी डॉ. जास्मिन शेख यांनी निलचे विशेष अभिनंदन केले आहे. यावेळी त्यांच्यासोबत गट शिक्षण अधिकारी उत्तम शिवाजी भोसले देखील उपस्थित होते.

निल कुडाळी हा राजापूर रॉयल चेस अकादमीमध्ये मोहसीन सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली बुद्धिबळाचे धडे गिरवत आहे. विशेष म्हणजे, निल हा जिल्हा परिषद विश्वनाथ विद्यालयाचा विद्यार्थी असून, तो सध्या पाचवी इयत्तेत शिकत आहे. अवघ्या ११ वर्षांच्या निलने मिळवलेले हे यश त्याच्या बुद्धिमत्तेचे आणि कठोर परिश्रमाचे द्योतक आहे.

या यशाबद्दल बोलताना डॉ. जास्मिन शेख यांनी निलचे कौतुक केले आणि त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. निलसारख्या युवा खेळाडूंना प्रोत्साहन मिळाल्यास ते भविष्यात आणखी मोठी कामगिरी करू शकतात, असे मत त्यांनी व्यक्त केले. निलच्या या यशाने राजापूर तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, त्याच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Total Visitor Counter

2455556
Share This Article