कुडाळ ः गणेशोत्सवाच्या निमित्ताने आमदार नीलेश राणे यांनी ‘शिवसेना एक्स्प्रेस’ ही विशेष रेल्वे गाडी गणेशभक्तांसाठी मोफत सोडण्यात येणार आहे.
या गाडीचा प्रवास २५ ऑगस्टला सकाळी १० वाजता दादर ते कुडाळ रेल्वे स्थानक असा या असेल. दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशभक्तांसाठी आमदार राणे यांनी मोफत रेल्वे प्रवासाची व्यवस्था केली आहे. दादर ते कुडाळ हा प्रवास पूर्णपणे मोफत असून, याला सरकारी ओळखपत्र अनिवार्य आहे. गणेश चतुर्थीनिमित्त आपल्या नातेवाइकांना चाकरमान्यांना भेटता यावे, तसेच आनंदाने हा सण कुटुंबासोबत साजरा करता यावा, यासाठी या मोफत सेवेचे आयोजन केले आहे. ज्या गणेशभक्तांना या रेल्वे गाडीमधून प्रवास करायचा आहे, त्यांनी सोमवार ते शनिवार दरम्यान सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत संपर्क साधावा आणि ‘शिवसेना एक्स्प्रेस’ विशेष रेल्वेसाठी जागा आरक्षित कराव्यात, असे आवाहन आमदार राणे यांनी केले आहे.
चाकरमान्यांसाठी २५ ऑगस्टला ‘शिवसेना एक्स्प्रेस’
