रत्नागिरी : तालुक्यातील निवळी व हातखंबा येथे झालेल्या टँकर अपघात प्रकरणी चालकांवर निष्काळजीपणे वाहन चालविल्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रत्नागिरी ग्रामीण पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली.
हातखंबा येथील अपघात प्रकरणी चालक सय्यद अबुतागीर ओलीम (रा. तामिळनाडू) व निवळी येथील अपघात प्रकरणी हरिश्चंद्र राजकुमार पटेल (रा. उत्तर प्रदेश) यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सोमवारी मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा शाळेजवळ सकाळी ९ च्या सुमारास टँकरवरील चालक सय्यद ओलीम याचा ताबा सुटून अपघात झाला होता. नियंत्रण सुटलेल्या टँकरने रस्त्याकडेला असलेल्या टपऱ्या व चार दुचाकींना चिरडले होते. सुदैवाने या अपघातात कुणीही गंभीर जखमी झाले नाही. या घटनेची नोंद ग्रामीण पोलिसांत करण्यात आली होती.
तर निवळी वॉटरपार्क समोरील रस्त्यावर जयगड ते बेंगळुरू जाणारा टँकर उलटला होता. ही घटना सोमवारी सकाळी ६ च्या सुमारास घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी टँकर चालक हरिश्चंद्र पटेल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे
टँकर अपघात प्रकरणी चालकांवर गुन्हा
