ठरली पहिली भारतीय
दिल्ली: भारतीय मानसशास्त्रज्ञ सुहानी शाहने इतिहास रचला आहे. इटलीमध्ये झालेल्या इंटरनॅशनल फेडरेशन फॉर मॅजिक सोसायटी वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये (एफआयसीएम) सुहानी शाहला ‘बेस्ट मॅजिक क्रिएटर’ पुरस्कार देण्यात आला आहे.
असे करणारी ती पहिली भारतीय ठरली आहे. यालाच जादूचा ऑस्कर देखील म्हणतात.
एफआयसीएमच्या 2025 आवृत्तीत ऑनलाइन क्रिएटर्ससाठी एक नवीन श्रेणी सुरू करण्यात आली आहे. या श्रेणीत त्यांचा सन्मान केला जातो, ज्यांनी डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून जादूच्या कलेचा प्रसार केला आहे. या श्रेणीत भारताच्या सुहानी शाह यांनी बाजी मारली आहे. शाह यांचे नाव जगभरातील नामांकित कलाकार जसे की जॅक रोड्स, जेसन लाडान्ये आणि मोहम्मद इमानी यांच्या सोबत नामांकनासाठी आले होते. त्यांचा हा विजय आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय कलाविश्वासाठी एक मैलाचा दगड ठरला आहे. सुहानी शाह या या श्रेणीत नामांकन मिळवणाऱ्या आणि जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय ठरल्या आहेत. त्या पारंपरिकरित्या पुरुषप्रधान असलेल्या या क्षेत्रात हे सन्मान मिळवणाऱ्या थोड्याच महिलांपैकी एक आहेत.
ऑस्ट्रेलियन टेलिव्हिजन शो ‘द प्रोजेक्ट’ मधून सुहानीला जागतिक ख्याती मिळाली आहे. तिने शोच्या एका सादरकर्त्याच्या आयफोनचा पासवर्ड बरोबर सांगितला होता. याशिवाय, सुहानीने तिच्या मानसिक कौशल्याचा वापर करून दुसऱ्या सादरकर्त्याच्या क्रशबद्दल योग्य माहिती दिली होती. त्यानंतर, तिच्या या क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल झाल्या.
सुहानी शाह या भारतातील सर्वात प्रसिद्ध मेंटलिस्ट आणि जादूगारांपैकी एक आहेत. त्यांनी केवळ ७ वर्षांच्या वयातच जादूच्या कलेत आपले करिअर घडवण्यास सुरुवात केली होती. इतक्या लहान वयातच त्यांनी शो करायला सुरुवात केली होती. आजपर्यंत त्यांनी ५,००० हून अधिक थेट परफॉर्मन्स दिले आहेत. देश-विदेशात लाखो लोक त्यांच्या कौशल्याचे चाहते आहेत. सुहानी शाह या आज भारतीय मेंटालिझमच्या क्षेत्रातील एक अत्यंत प्रभावशाली व्यक्तिमत्त्व बनल्या आहेत.
भारतीय मानसशास्त्रज्ञ सुहानी शाह ‘बेस्ट मॅजिक क्रिएटर’ पुरस्काराने सन्मानित
