गुहागर/ उदय दणदणे: कोकणातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व, सुप्रसिद्ध उद्योजक तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद सीताराम गांधी यांना श्री पाणबुडी देवी कलामंच मुंबई यांच्यातर्फे समाज रत्न पुरस्कार-२०२५ ने गौरविण्यात आले असून हा पुरस्कार १५ जुलै रोजी दिनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विलेपार्ले मुंबई येथे प्रदान करण्यात आला.
कलगी तुरा कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर निवृत्त पोलिस उपायुक्त (मुंबई) अरविंद म्हापदी यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
प्रमोद गांधी गुहागर तालुक्यातील मुंढर गावचे सुपुत्र असून सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा क्षेत्रात त्यांचे भरीव योगदान आहे. गुहागर मतदारसंघात तसेच तालुक्यातील अनेक गाव वाडी वस्तीवर विविध समस्या प्रती यथाशक्ती आर्थिक, वस्तू स्वरूपात निस्वार्थ मदत करत जनतेला दिलासा देण्याचे महान कार्य त्यांच्या हातून अविरत घडत आहे. प्रमोद गांधी समाजरत्न पुरस्काराने सन्मान झाला असून त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवत लोकांची मदत केली आहे. प्रमोद गांधी हे गेले अनेक वर्षे शालेय विद्यार्थी तसेच नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर तसेच प्रतिवर्षी रक्तदान शिबिर आयोजित करून सामजिक हित जोपासत आहेत. कोकणातील लोककला व कोकणचे सांस्कृतिक वैभव टिकून राहण्यासाठी येथील लोक कलावतांच्या पाठी खंबीरपणे उभे राहतात. त्यांच्या अशा विविध सेवाभावी कार्याची दखल घेऊन कोकणातील कलाक्षेत्रातील अग्रगण्य संस्था श्री पाणबुडी देवी कलामंच मुबंई यांच्यातर्फे प्रमोद गांधी यांना समाजरत्न पुरस्कार- २०२५ ने गौरविण्यात आले.
हा मानाचा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल प्रमोद गांधी यांचे सामाजिक, राजकीय अशा विविध क्षेत्रातून अभिनंदन आणि कौतुक होत असून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर, नमन लोककला संस्था कार्यक्षेत्र भारत, कलगीतुरा समाज उन्नती मंडळ मुंबई सह शाहीर शाहिद खेरटकर, समस्त हितचिंतकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
प्रमोद गांधी यांना समाजरत्न पुरस्काराने सन्मानित
