मंडणगड : तालुक्यातील दहागाव दळवीवाडी येथे ११ जुलै २०२५ रोजी सकाळी ११.०० ते १३ जुलै २०२५ रोजी पहाटे ४.३० च्या दरम्यान दारूच्या व्यसनामुळे तोल जाऊन विहिरीत पडून श्रीरंग हैबर जगताप (वय ६२, रा. दहागाव दळवीवाडी, मंडणगड) यांचा मृत्यू झाला आहे.
अनिल जनार्दन जगताप यांनी याबाबत खबर दिली आहे. मंडणगड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.
मंडणगड येथे दारूच्या व्यसनामुळे विहिरीत पडून वृद्धाचा मृत्यू
