संगमेश्वर: गणेशोत्सव तोंडावर असताना मखर बनवताना अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने एका प्रौढाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना संगमेश्वर तालुक्यातील साडवली भुवडवाडी येथे घडली आहे. अनंत पांडुरंग बडद (५५) असे त्यांचे नाव आहे.
गणेशोत्सव अवघ्या एका दिवसावर आल्याने अनंत बडद आणि त्यांचा मुलगा अस्मित बडद हे दोघे उत्साहात तयारी करत होते. सोमवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास मखरची सजावट करत असताना, अनंत बडद यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला.
त्यांना तात्काळ देवरुख ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र वैद्यकीय सूत्रांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
संगमेश्वर : मखर करताना साडवली येथील प्रौढाचा हृदयविकाराने मृत्यू
