खोपोली : योगीराज स्वामी गगनगिरी महाराज यांचा गुरुपौर्णिमा महोत्सव यंदाही भाविकांच्या उपस्थितीत अत्यंत भक्तिभावाने साजरा होणार आहे. बुधवार, ९ जुलै ते शुक्रवार, ११ जुलै दरम्यान खोपोली येथील त्यांच्या समाधीस्थानी होमहवन, अभिषेक भजन-कीर्तन-प्रवचन,आदीधार्मिक विधी बरोबर स्वामी गगनगिरी महाराजांचे नामस्मरणाने संपूर्ण आश्रम दुमदुमून जाणार!
महोत्सवाची सुरुवात बुधवारी (९ जुलै) होमहवनाने होणार असून, गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवशी (१० जुलै) पहाटे ४ वाजता वेदमंत्रांच्या गजरात श्रींच्या मूर्तीचे मंगल स्नान होईल. त्यानंतर पादुकांची पूजा-अभिषेक, फुलांची सजावट आणि मुख्य दर्शन सुरू होईल. सकाळी ६ वाजल्यापासून दर्शनासाठी प्रारंभ होईल व रात्रौ ८.३० वाजता महाआरतीने होईल.भाविकांसाठी सकाळी १० पासून महाप्रसाद उपलब्ध असेल. भजन-कीर्तन, प्रवचन, होमहवन व भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या भक्तिभावपूर्ण सोहळ्याची सांगता ११ जुलै रोजी (शुक्रवार) होमहवनाने होईल. लाखो भक्तांच्या श्रद्धेचे केंद्र असलेल्या या कार्यक्रमात सहभागी होऊन गगनगिरी महाराजांच्या चरणी नतमस्तक व्हावे, असे आवाहन आश्रम संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.
खोपोली येथे ९ ते ११ जुलैदरम्यान स्वामी गगनगिरी महाराज गुरुपौर्णिमा उत्सव!

Leave a Comment