GRAMIN SEARCH BANNER

मुंबई–गोवा महामार्गावर एसटीच्या धडकेत गाय ठार, एक गाय गंभीर जखमी

चिपळूण : सावर्डे कोंडमाळा गावाच्या हद्दीत मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावर एसटी महामंडळाच्या बसने दोन गायींना जोरदार धडक दिल्याची संतापजनक घटना घडली. या अपघातात एका गायीचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरी गाय गंभीर जखमी झाली आहे. भरधाव वाहने, चालकांची बेफिकिरी आणि महामार्गावरील अपुरे नियंत्रण यामुळे अशा घटना सातत्याने घडत असतानाही संबंधित यंत्रणांकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
अपघातानंतर जखमी गायीवर तातडीने वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उपचार करण्यात आले. या वेळी युवा सेना उपतालुका प्रमुख स्वरूप रविंद्र साळवी, अजय जाधव तसेच सावर्डे पोलिसांनी तत्पर सहकार्य केले. मात्र, वेळेवर उपाययोजना न झाल्याने एका निष्पाप गायीचा बळी गेला असून महामार्गावरील सुरक्षिततेबाबत पुन्हा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.

मुंबई–गोवा महामार्गावर मोकाट जनावरांचा प्रश्न, वेगमर्यादेचे उल्लंघन आणि अपघातांची मालिका थांबवण्यासाठी ठोस व कठोर पावले उचलली नाहीत, तर भविष्यात आणखी जीव जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Total Visitor Counter

3483439
Share This Article