GRAMIN SEARCH BANNER

चिपळुणात गांजाचे सेवन करताना दोघांना अटक

Gramin Varta
7 Views

चिपळूण : चिपळूण-गुहागर बायपासवरील मुस्लिम कम्युनिटी सेंटरजवळ गांजा सदृश्य अंमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या दोघांना चिपळूण पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले असून, पुढील तपास सुरू आहे.

दिनांक २ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ४.२० च्या सुमारास चिपळूण पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल रुपेश उल्हास जोगी (पोकों/१३१५) यांना गस्त घालत असताना, मुस्लिम कम्युनिटी सेंटरच्या समोरील रोडच्या पलीकडील जंगलमय परिसरात एक व्यक्ती संशयास्पदरित्या अंमली पदार्थांचे सेवन करत असल्याचे आढळले. पोलिसांनी तात्काळ कारवाई करून महमद सामी गफ्फार महालदार (वय २०, रा. चिवेली बंदर, ता. चिपळूण) याला ताब्यात घेतले. या प्रकरणी रात्री ८.१३ वाजता गु.आर.नं. १७२/२०२५ अंतर्गत नारकोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस ॲक्ट, १९८५ च्या कलम ८(क) आणि २७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्याच दिवशी दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास, दुसऱ्या घटनेत पोलीस हेड कॉन्स्टेबल वृशाल सगुण शेटकर यांनाही त्याच परिसरात सैफान लियाकत महालदार (वय २६, रा. चिवेली बंदर, ता. चिपळूण) हा गांजा सदृश्य पदार्थांचे सेवन करत असताना आढळून आला. त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही केली. याप्रकरणी रात्री ८.५३ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या दोन्ही प्रकरणांमध्ये आरोपी हे बेकायदेशीररित्या अंमली पदार्थांचे सेवन करत असताना रंगेहाथ सापडल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

Total Visitor Counter

2647341
Share This Article