GRAMIN SEARCH BANNER

चिपळूण : कळकवणेच्या सोहम कदमची महाराष्ट्र संघात निवड

चिपळूण: तालुक्यातील दसपटी विभागातील कळकवणे क्रीडा मंडळाचा अष्टपैलू खेळाडू सोहम कदम याची उत्तराखंड येथे होणाऱ्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.

सोहम हा एका ग्रामीण भागातील संघातील खेळाडू असून, त्याची १८ वर्षे वयोगटात निवड झाल्याबद्दल विविध स्तरातून त्याचे अभिनंदन केले जात आहे.

सोहमने २०१९-२० पासून कबड्डीची सुरुवात केली. त्यांच्या गावचा संघ अनेक स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करताना बघून सोहमला कबड्डीची आवड निर्माण झाली. कळकवणे क्रीडा मंडळ संघाच्यावतीने एक कबड्डी शिबिर घेण्यात आले. त्या वेळी राष्ट्रीय कबड्डी खेळाडू प्रो कबड्डी खेळाडू स्वप्नील शिंदे, शुभम शिंदे, आदित्य शिंदे, जगदीश शिंदे, विजय घाणेकर अशा राष्ट्रीय खेळाडूंनी मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे कळकवणे क्रीडा मंडळ कळकवणे संघाचा राष्ट्रीय खेळाडू प्रदीप शिंदे, अक्षय शिंदे, संघाचे एम. डी. शिंदे, नीलेश शिंदे, महेंद्र शिंदे, तुषार घडशी, महेश मिसाळ, शैलेश वनगे, धनंजय ढगळे, संघातील सर्व ज्येष्ठ खेळाडू यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.

Total Visitor Counter

2475247
Share This Article