रत्नागिरी: गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य, रत्नागिरी विभाग यांच्या वतीने यंदाही विजयादशमी-दसरा या पवित्र दिनाचे औचित्य साधून ‘आधी तोरणं गडाला, मग घराला’ या अनोख्या संकल्पनेतून रत्नदुर्ग किल्ल्याच्या महाद्वाराजवळ उत्साहात गडपूजन करण्यात आले. सलग दुसऱ्या वर्षी प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या या कार्यक्रमामुळे गड संवर्धनाची आणि इतिहासाच्या जतनाची प्रेरणा रत्नागिरीकरांना मिळाली.
गडकिल्ले ही केवळ दगडांची बांधकामे नसून, ती आपल्या इतिहासाची, स्वाभिमानाची आणि शौर्याची जिवंत प्रतीके आहेत. हा महान इतिहास कायम सर्वांच्या मनात जिवंत राहावा, याच उदात्त उद्देशाने प्रतिष्ठानने या गडपूजनाचे आयोजन केले होते.
या प्रेरणादायी सोहळ्यासाठी अनेक मान्यवर आणि शिवप्रेमी उपस्थित होते. जिजाऊ संस्थेचे जिल्हाध्यक्ष ॲड. महेंद्रजी मांडवकर सर, सचिव केदार सर, तालुकाध्यक्ष मंदार नैकर सर आणि परशुराम शिंदे आदी मान्यवरांनी गडपूजन करून शिवकार्याला शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली. यामध्ये संपर्क प्रमुख पालवी रसाळ, सांस्कृतिक मंत्री समृद्धि चालके, रणरागिणी खुशी गोताड, रुचि गोताड, सेजल मेस्त्री, रश्मि जाधव, श्वेता भितळे यांचा तसेच, रत्नागिरी विभाग अध्यक्ष दीपेश वारंग सर, विभाग प्रमुख मयूर भितळे यांचा सक्रिय सहभाग होता.
गड सेवक म्हणून नयन कदम, शुभम आग्रे, आकाश जोगलेकर, तन्मय जाधव, सूरज खोचाडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी स्थानिक ग्रामस्थांचा आणि सामाजिक संस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बीजेपी कार्यकर्ते रमाकांत आयरे, शुभागिनी जाधव, शशिकांत जाधव यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच, श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान रत्नागिरी विभागाचे अमित काटे, जयदीप साळवी, समीर सावंत, अमेय पाडावे, ऋषिकेश गुरव, चैतन्य कोळवणकर आदी सदस्य उपस्थित होते. इतिहासप्रेमी केतकी सावंत आणि जयेश शिवलकर यांनीही उपस्थित राहून गडपूजनाच्या उपक्रमाला पाठिंबा दिला.
हा उपक्रम म्हणजे केवळ पूजा नसून, आपल्या गड-किल्ल्यांप्रती आदर आणि त्यांच्या संवर्धनाची सामूहिक शपथ आहे, असे मत यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. प्रतिष्ठानच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे.
महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वारशाचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी असे उपक्रम सातत्याने होणे गरजेचे आहे.