रत्नागिरी: अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या राज्यस्तरीय नाट्यपरिषद एकांकिका करंडक स्पर्धेमध्ये महाराजा फाउंडेशन पुरस्कृत गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) रत्नागिरीच्या बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स आणि माजी विद्यार्थी यांच्या सहकार्याने निर्मित केलेली चिन्मय सरपोतदार लिखित कॉफीन एकांकिकेला अंतिम फेरीमध्ये प्रवेश मिळाला आहे.
वेदांग सौंदलेकर दिग्दर्शित कॉफीन एकांकिकेमध्ये सर्वसामान्यांच्या घरांमध्ये आपल्या मुलाच्या शिक्षणाबद्दल आणि नोकरी बद्दल अवास्तव अशा अपेक्षा असतात आणि त्यातूनच फॉरेनला जाण्यासाठी जणू काही स्पर्धाच लागली आहे असे आपल्याला दिसून येते. अशा वेळेला त्या मुलाला जिवंतपणीच मृत अवस्थेसारखे जगावे लागते. कॉफीन म्हणजे शवपेटी अशा प्रतीकात्मक आशियाची एकांकिका लोकगीताच्या माध्यमातून सादरीकरण झाले आहे. 16 ते 17 कलाकार स्टेज वरती दर्जेदार आणि लोकांच्या मनामध्ये मुलांच्या भवितव्याबद्दल वास्तववादी अंजन घालणारी एकांकिका परीक्षकांच्या मनाला भिडलेली दिसते.
अखिल भारतीय नाट्य परिषद रत्नागिरी शाखेचे कार्यवाहक आणि केंद्रप्रमुख श्री समीर इंदुलकर समन्वयक डॉ.आनंद आंबेकर, श्री.सुनील बेंडखळे आणि कार्यकारणी सदस्य यांच्या सहकार्यातून रत्नागिरी केंद्रावर एकूण नऊ एकांकिका रजिस्टर झाल्या त्यातील आठ एकांकिकेचे सादरीकरण झाले . परीक्षक श्री आशीर्वाद मराठे आणि श्रीमती मराठे यांच्या अभ्यास पूर्ण परीक्षणातून कॉफीन एकांकिकेला अंतिम फेरीमध्ये प्रवेश मिळाला. एकांकिकेच्या निवडीनंतर अनेक ज्येष्ठ नाट्यकर्मिनी मार्गदर्शन करण्याची इच्छा प्रकट केली आहे. यासाठी लवकरच विशेष प्रयोगाचे नियोजन करण्यात येणार आहे.
यशस्वी एकांकिकेच्या पुढील वाटचालीसाठी महाराजा फाउंडेशनचे अध्यक्ष ऍड.सुजित कीर आणि त्यांच्या मित्र मंडळांनी शुभेच्छा दिल्या आहेत. गोगटे कॉलेजचे प्राचार्य डॉ.मकरंद साखरकर आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पुढील वाटचालीसाठी सदिच्छा दिली आहे.