GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी : पूर्णगडमध्ये कामगाराने मालकाची स्कूटर, ३ मोबाईल चोरले

रत्नागिरी: तालुक्यातील पूर्णगड गोळप बौद्धवाडी येथे एका कामगाराने मालकाची स्कूटर आणि इतर कामगारांचे मोबाईल फोन चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. १३ जून रोजी रात्री ११ ते १४ जून रोजी सकाळी ७ वाजेदरम्यान ही चोरी झाली. १६ जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी मोतीराम बासू राठोड (वय ४४, मूळ रा. देवूर हिप्परगी, जि. विजयपुरा, कर्नाटक, सध्या रा. पावस, रत्नागिरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, शाहिनूर मंडळ (रा. कोपा, जि. बिरभूम, पश्चिम बंगाल) नावाचा कामगार त्यांच्याकडे सेंट्रिंगच्या कामासाठी होता. याच शाहिनूर मंडळने ४०,००० रुपये किमतीची पांढऱ्या रंगाची होंडा अॅक्टिवा ५ जी (Honda Activa 5G) स्कूटर (क्रमांक MH ०९ FH ९४४८) चोरून नेली. यासोबतच, अनिल प्रोमु राठोड यांचा २,००० रुपये किमतीचा काळ्या रंगाचा रेडमी सी ५३ कंपनीचा मोबाईल हँडसेट, अजित तुकाराम चव्हाण यांचेकडील २,००० रुपये किमतीचा निळ्या रंगाचा रेडमी ९ प्रो कंपनीचा मोबाईल हँडसेट आणि विनोद गांधी राठोड यांचा २,००० रुपये किमतीचा काळ्या रंगाचा रेडमी सी ५३ कंपनीचा मोबाईल हँडसेट असे एकूण तीन मोबाईल हँडसेट चोरून नेले आहेत.

एकूण ४६,००० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पूर्णगड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपी शाहिनूर मंडळचा शोध सुरू आहे.

Total Visitor Counter

2455614
Share This Article