बीड: संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी वाल्मीक कराडच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या जामीन अर्जावर आणि इतर सहा आरोपींनी केलेल्या दोषमुक्तीच्या अर्जावर सोमवारी(दि.४) सुनावणी होती.
याबाबत बचाव पक्षाकडून युक्तिवादाची तयारी दर्शवली गेली. मात्र,विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वलनिकम हे राज्यसभा खासदार असल्याने व ते सध्या संसदेच्या अधिवेशनात व्यस्त असल्याने या युक्तिवादासाठी सरकारी पक्षाने वेळ मागून घेतल्याने या प्रकरणाची पुढील सुनावणी १८ ऑगस्ट रोजी होणार आहे. मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर २०२४ रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली होती.या प्रकरणात सीआयडीच्या विशेषतपास पथकाने ८० दिवसांत तपास पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. या प्रकरणात मकोकाही लावला गेला होता. त्यामुळे विशेष मकोका न्यायालयात या प्रकरणी सुनावणी सुरू आहे.गेल्या सुनावणीवेळी आरोपी वाल्मीक कराडचा दोषमुक्तीचा अर्ज न्यायालयाने फेटाळला होता. वाल्मीक कराडची बँक खातीही गोठवली आहेत. याबाबत यापूर्वी युक्तिवाद पूर्ण झालेला आहे.खात्यांचे फ्रिज काढण्याची मागणी बचाव पक्षाने केलेली आहे. मात्र याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. सोमवारीही न्यायालयाने निर्णय दिला नाही. गत सुनावणीवेळी वाल्मीककराडचा दोषमुक्तीचा अर्जविशेष मकोका न्यायालयाने फेटाळला होता. याविरोधात आता वाल्मीक कडून उच्चन्यायालयात अपील केले जात आहे. सोमवारी कराडचा मुलगा अपील करण्यासाठी गेला. दरम्यान, याप्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे हा अद्याप फरार आहे. त्याच्याविरोधात बीएनएसएस कलम ७२नुसार अटक वॉरंट काढण्याची मागणी सरकारी पक्षाकडून केली गेली. याबाबतचा अर्ज अॅड. कोल्हे यांनी न्यायालयाला दिला.
संतोष देशमुख हत्या प्रकरण: कराडच्या जामिनावर १८ ऑगस्टला सुनावणी
