संगमेश्वर : तालुक्यातील चिखली बौध्दवाडी येथे घरात घुसलेल्या अजगराला सर्पमित्र अक्षय मोहिते व ग्रामस्थांनी सुरक्षीत पकडून जीवदान दिले. अजगराला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
संगमेश्वर तालुक्यातील चिखली बौद्धवाडी येथील विकास मोहिते यांच्या घरात मंगळवारी सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास अचानक अजगराने प्रवेश करून कोंबड्यावर हल्ला करत एका कोंबडीला गिळंकृत केले. दुसऱ्या कोंबडीला पकडणार इतक्यात कोंबड्यांचा कलकलाट सुरू झाला. त्याचवेळी विकास मोहिते व घरातील मंडळींनी धाव घेतली असता त्यावेळी त्यांना भला मोठा अजगर दिसून आला. तात्काळ त्यांनी सर्पमित्र अक्षय मोहिते याला बोलावण्यात आले. अक्षय याने कोणतीही इजा न होता अजगराला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले. आठ फुट लांबीचा अजगर होता. अजगराला पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली
संगमेश्वर चिखली येथे घरात घुसलेल्या अजगराने कोंबडी केली फस्त, सर्पमित्राने दिले जीवदान
