GRAMIN SEARCH BANNER

खेडमध्ये 43 वर्षीय तरुणाचा आकस्मिक मृत्यू

Gramin Varta
97 Views

खेड : शहरातील महात्मा फुले नगर परिसरातील 43 वर्षीय व्यक्तीचा आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना घडली. निलंबर तानाजी वागुळे असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

वागुळे हे दारूच्या नशेत एका घराच्या लोखंडी जिन्याजवळ पडले होते. नातेवाईकांनी त्यांना घरी आणल्यानंतर त्यांना रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या. प्रकृती अधिक बिघडल्याने त्यांना तातडीने कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.

या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Total Visitor Counter

3369998
Share This Article