GRAMIN SEARCH BANNER

मंडणगडमध्ये कालभैरव मंदिरात चोरी; पितळेच्या वस्तूंसह सीसीटीव्ही डीव्हीआर लंपास

Gramin Varta
53 Views

मंडणगड : सोवेली येथील कालभैरव मंदिराच्या मुख्य दरवाजाची कडी उघडून मंदिरातील मौल्यवान वस्तू चोरीस गेल्याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात मंडणगड पोलीस ठाण्यात २७ डिसेंबर २०२५ रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

या प्रकरणी अरविंद लक्ष्मण भोसले (वय ६१, रा. सोवेली गावठाण) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, २४ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ७ ते २५ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ६ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने कालभैरव मंदिरात प्रवेश करून चोरी केली. मंदिराला कुलूप नसल्याने मुख्य दरवाजाची कडी उघडून आत शिरत चोरट्याने लबाडीच्या उद्देशाने पितळेच्या वस्तू तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर चोरून नेला.

या चोरीत एकूण ३० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास झाला आहे. त्यामध्ये १५ किलो वजनाची व ८ हजार रुपये किंमतीची पितळेची घंटा, ९ हजार ५०० रुपये किंमतीचा पितळेचा कलश, ९ हजार रुपये किंमतीचा सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर व हार्डडिस्क तसेच ४ किलो वजनाची व ४ हजार रुपये किंमतीची पितळेची घंटा यांचा समावेश आहे.

या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा रजिस्टर क्रमांक ७९/२०२५ नुसार भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३०५(घ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, मंडणगड पोलीस अधिक तपास करत आहेत.

Total Visitor Counter

3210571
Share This Article