GRAMIN SEARCH BANNER

ब्रेकिंग: संगमेश्वर येथून बेपत्ता झालेल्या महिलेची चप्पल आणि लोकेशन चिपळूणच्या गांधारेश्वर पुलावर

Gramin Varta
1.7k Views

आत्महत्या की घातपात? चर्चेला उधाण

चिपळूण: चिपळूण तालुक्यातील गांधारेश्वर नदीवरील पुलावर एका महिलेची चप्पल, पर्स आणि मोबाईल सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या महिलेने नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेने चिपळूण आणि संगमेश्वर तालुक्यात खळबळ उडाली आहे.ही महिला घरात कोणालाही काही न सांगता निघून गेली होती, त्यामुळे तिच्या पतीने ती बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत दिली होती. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

या घटनेची सविस्तर माहिती अशी की, संगमेश्वर येथील रहिवासी असलेली अपेक्षा अमोल चव्हाण ही काल सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घरातून कोणालाही काही न सांगता निघून गेली. तिच्या पतीने, अमोल चव्हाण यांनी तात्काळ संगमेश्वर पोलीस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी तिच्या मोबाईल लोकेशनची तपासणी केली असता, तिचे शेवटचे लोकेशन चिपळूण येथील गांधरेश्वर पुलावर दिसून आले.

या माहितीनंतर, अपेक्षाचे कुटुंब तातडीने गांधारेश्वर पुलावर पोहोचले. तिथे त्यांना पुलावर अपेक्षाची चप्पल आणि पर्स सापडली, ज्यामुळे त्यांनी चिंता व्यक्त केली.

सध्या पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. या महिलेने खरोखरच पुलावरून उडी मारून आत्महत्या केली की, आत्महत्येचा बनाव करून ती जवळच्या रेल्वे स्टेशनवरून दुसऱ्या ठिकाणी निघून गेली, याबाबत पोलीस तपास करत आहेत. चिपळूण पोलीस लवकरच या प्रकरणाचा छडा लावतील अशी अपेक्षा आहे.

Total Visitor Counter

3366874
Share This Article