GRAMIN SEARCH BANNER

‘माझी वसुंधरा अभियान ५.०’मध्ये राजापूर पालिका जिल्ह्यात प्रथम

राजापूर: ‘माझी वसुंधरा अभियान ५.०’मध्ये उल्लेखनीय यश संपादन करत राजापूर नगरपालिकेने जिल्ह्यात प्रथम, कोकण विभागात द्वितीय आणि राज्यात १३ वा क्रमांक पटकावला आहे.

यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्ष ॲड. हुस्नबानू खलिफे यांनी सर्व नागरिक, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करत मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. हे यश केवळ पालिकेचे नसून राजापूरच्या प्रत्येक नागरिकाचे आहे. पर्यावरण संवर्धनासाठी राबवलेल्या उपक्रमांना नागरिकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळेच ही यशस्वी झेप शक्य झाली, असे त्या म्हणाल्या.

शहरात राबवण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमा, वृक्षारोपण, प्लास्टिकमुक्ती, पाणी संवर्धन आणि घनकचरा व्यवस्थापन यांसारख्या उपक्रमांना अधिकारी-कर्मचारी, पदाधिकारी व नागरिकांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे त्यांनी नमूद केले.

भविष्यातही पर्यावरण रक्षणासाठी अधिक प्रभावी उपक्रम राबवून राजापूर शहर स्वच्छ, सुंदर आणि हरित करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करू, असा विश्वासही नगराध्यक्ष खलिफे यांनी व्यक्त केला.

Total Visitor Counter

3485444
Share This Article