GRAMIN SEARCH BANNER

महिंद्रा लास्ट माइल मोबिलिटीची ‘उडो’ ई-ऑटो बाजारात

Gramin Varta
3 Views

मुंबई: महिंद्रा लास्ट माइल मोबिलिटीने इलेक्ट्रिक थ्री-व्हीलर विभागात नवा अध्याय सुरू करत ‘उडो’ (Mahindra UDO e Auto) हा आधुनिक ई-ऑटो बाजारात सादर केली आहे.

विमानाच्या डिझाइनने प्रेरित असलेल्या या ‘ऑटोप्लेन’मुळे पारंपरिक ऑटो रिक्षांच्या रचनेत मोठा बदल पाहायला मिळत आहे. मोठी विंडशील्ड, आकर्षक हेडलॅम्प्स, स्टायलिश मिरर आणि एरोडायनामिक बॉडीमुळे उडो रस्त्यावर उठून दिसतो. या मॉडेलमध्ये प्रथमच फुल मोनोकोक बॉडी देण्यात आली असून त्यामुळे वाहनाला अधिक मजबुती आणि स्थिरता प्राप्त होते. ‘UDO’ या नावाचा अर्थ मराठीत आणि हिंदीत ‘उडणे’ असा होत असल्याने त्याची रचना देखील त्यानुसार करण्यात आली आहे.

चालकांच्या सोयीसाठी या ऑटोमध्ये ‘पायलट सीट’ देण्यात आली आहे. ही सीट पारंपरिक सीटपेक्षा सुमारे 20 टक्के जाड असून दीर्घकाळ वाहन चालवताना होणारा थकवा कमी करण्यास मदत करते. प्रवाशांसाठी अधिक लेग रूम आणि हेड रूमसह रुंद आसनव्यवस्था देण्यात आली आहे. इंडिपेंडंट रियर सस्पेन्शन आणि ड्युअल फोर्क फ्रंट सस्पेन्शनमुळे खडबडीत रस्त्यावरही आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळतो.

उडोमध्ये 11.7 किलोवॅट तास क्षमतेची IP67 रेटेड लिथियम-आयन बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीच्या दाव्यानुसार हा ऑटो प्रत्यक्षात 200 किमीपर्यंत तर ARAI प्रमाणित 255 किमी रेंज देतो. 10 किलोवॅट पीक पॉवर आणि 52 एनएम टॉर्क असलेल्या PMS मोटरसह रेंज, राइड आणि रेस असे तीन ड्राइव्ह मोड उपलब्ध आहेत. रेस मोडमध्ये कमाल वेग 55 किमी प्रतितास असून त्यामुळे चालकांना अधिक फेऱ्या पूर्ण करून उत्पन्न वाढवता येईल.

रिव्हर्स थ्रॉटल, क्रिप मोड, हिल होल्ड असिस्ट आणि रिजेनरेटिव्ह ब्रेकिंगसारख्या सुविधा शहरातील गर्दीच्या वाहतुकीत उपयोगी ठरतात. मजबूत ड्रम ब्रेक्स, ट्यूबलेस टायर्स आणि 6 वर्षे किंवा 1.5 लाख किमी वॉरंटी यामुळे सुरक्षिततेलाही प्राधान्य देण्यात आले आहे.३,८४,२९९.०० रुपये एक्स-शोरूम आहे, परंतु मर्यादित कालावधीसाठी, UDO ३,५८,९९९.०० रुपयांमध्ये उपलब्ध असेल. उडो भारतीय इलेक्ट्रिक ऑटो बाजारात नवे मानदंड प्रस्थापित करेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Total Visitor Counter

3096182
Share This Article