GRAMIN SEARCH BANNER

वाटद खंडाळा दीक्षाभूमी येथील श्रामणेर शिबीराला  भिक्खू संघाचे मार्गदर्शन

Gramin Varta
67 Views

जाकादेवी/ वार्ताहर :  वाटद खंडाळा येथील दीक्षाभूमी बुद्धविहारात १०दिवसीय कालावधीसाठी सुरू असलेल्या श्रामणेर शिबिराला वाटद पश्चिम बौद्धवाडी येथील महिला मंडळाकडून १० हजारांचे धम्मदान भंते यांना प्रदान करण्यात आले.

या श्रामणेर शिबिराला खंडाळा-वाटद परिसरातून शिबिरार्थींचा अतिशय उत्तम प्रतिसाद लाभला आहे.या शिबिराला आणि धम्माच्या कार्याला गती देण्यासाठी बौद्धजन पंचायत समिती वाटद (पश्चिम) शा.क्र.३२ च्या आदर्श महिला मंडळाकडून रोख दहा हजार रुपयांचे धम्मदान भंते यांचेकडे सुपूर्द करण्यात आले.यावेळी  शाखेच्या अध्यक्षा पायल जाधव,सचिव दिपाली गमरे,सभापती अंकिता जाधव,पूजा जाधव तसेच या शिबिरासाठी फार मोठे योगदान देणाऱ्या जिल्हा  समाज कल्याण समितीच्या माजी सभापती सौ. ऋतुजा राजेश जाधव व साक्षी जाधव यांचीही विशेष उपस्थिती होती. धम्मदान देणाऱ्या महिलांच्या  सामाजिक बांधिलकीचे उपस्थित आदरणीय भिक्खू संघाने कौतुक केले.ग्रामीण भागातील या महिलांची कामगिरी भविष्यातील धम्माच्या चळवळीला नक्कीच गती देईल,असे भंतेनी  प्रतिक्रिया व्यक्त करून समाधान व्यक्त केले. या श्रामणेर शिबिरामध्ये शिबिरार्थ्यांना आदरणीय धम्म गुरु भंते यांच्याकडून धार्मिक पूजा पाठ, त्रिशरण पंचशील ,अष्टशील, दशशील यांविषयी सखोल मार्गदर्शन तसेच बौद्ध धम्मातील आचार विचार जीवनावश्यक जीवनमूल्य याविषयी अतिशय विज्ञानवादी, सविस्तर पद्धतीची परिवर्तनवादी आणि वैज्ञानिक शिकवण बिहार बुद्धगया येथील भंते संघकीर्ती मुनी,अजहन मिलिंद बोधी अहमदनगर जेहूर पुणे. व मुंबई येथील भिक्खू परमानंद  यांच्या मार्गदर्शनातून या शिबिरात धम्मदेशना दिली जात आहे. शिबीर यशस्वीतेसाठी अनेक धम्म बांधवांनी तसेच शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील व्यक्तींनी सढळहस्ते आर्थिक मदत करत असल्याचे शिबीराचे प्रमुख आयोजकांच्यावतीने डॉ.राजेश जाधव यांनी सांगितले.

Total Visitor Counter

3420613
Share This Article