GRAMIN SEARCH BANNER

दारूच्या नशेत बडबड करू नको सांगितल्याच्या रागातून भावाने भावाच्या गुप्तांगात घातली लाथ

Gramin Varta
242 Views

खेड :  तालुक्यातील खोपरेवाडी येथे दारूच्या नशेत असलेल्या धाकट्या भावाने आपल्या मोठ्या भावावर जीवघेणा हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. दारूच्या नशेत बडबड करू नको असे सांगणे मोठ्या भावाच्या जिवावर बेतले असून, या प्रकरणी पोलिसांनी आरोपी भावाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना १५ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास खोपरेवाडी येथे घडली. फिर्यादी संदीप कोंडीराम खरावते (वय ४५) हे आपल्या घरी असताना त्यांचा भाऊ आरोपी सुरेश कोंडीराम खरावते हा दारूच्या नशेत मोठ्याने बडबड करत होता. संदीप यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला आणि दारूच्या नशेत बडबड करू नकोस असे सांगितले. याचा तीव्र राग मनात धरून सुरेश याने संदीप यांना सुरुवातीला हाताच्या थापटीने मारहाण केली. त्यानंतर रागाच्या भरात आरोपीने फिर्यादीचे गुप्तांग हाताने ओढून त्यांना गंभीर दुखापत केली आणि जमिनीवरील दगड उचलून त्यांच्या डोक्यात मारला.

या हिंसक हल्ल्यानंतर आरोपीने फिर्यादीला अश्लील शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिली. या हल्ल्यात संदीप खरावते हे जखमी झाले असून त्यांनी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी सुरेश खरावते याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ११५(२), ११८(१), ३५१(२), ३५१(३) आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे करत असून कौटुंबिक वादातून झालेल्या या गंभीर प्रकारामुळे परिसरात चर्चा सुरू आहे.

Total Visitor Counter

3199276
Share This Article