GRAMIN SEARCH BANNER

कसबा हायस्कूलच्या चार खेळाडूंची राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेसाठी निवड

संगमेश्वर: रत्नागिरी जिल्हा खो-खो असोसिएशन मार्फत सन २०२५-२६ या वर्षातील कुमार मुले जिल्हा अजिंक्य पद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा ओणी हायस्कूल ओणी,राजापूर येथे रविवार, दि१६ नोव्हेंबर २०२५ रोजी १८ वर्षाखालील वयोगटातील खोखो स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते.

स्पर्धेमध्ये संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी, कसबा संचालित न्यू इंग्लिश हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, कसबा संगमेश्वर या विद्यालयातील १८ वर्षे वयोगट विद्यार्थ्यांचा संघ सहभागी झालेला होता.

सदर स्पर्धेत कसबा हायस्कूलच्या १८ वर्षे वयोगट मुलांच्या खो-खो संघाने अभूतपूर्व खेळाचे प्रदर्शन करत अटीतटीच्या सामन्यात संयुक्त प्रथम क्रमांक पटकावले.

स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केल्याबद्दल विद्यालयातील विद्यार्थी 1) कुमार आशिष अनंत बालदे,कुमार आर्यन अनंत बालदे,कुमार अथर्व श्रीराम गराटे, कुमार पार्थ मनोज बुदर यांची राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

सदर खेळाडू बुऱ्हाणनगर, अहिल्यानगर येथे होणाऱ्या ५१ व्या राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेमध्ये रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेत निवड झाल्याबद्दल यशस्वी खेळाडूंचे व मार्गदर्शक शिक्षक यांचे संस्था अध्यक्ष कॅप्टन अकबर खलपे, उपाध्यक्ष श्री.नियाज कापडी, उपाध्यक्ष श्री.इब्राहिम काझी, सचिव श्री.सईद उपाद्ये, सहसचिव श्री.शौकतअली खलफे, खजिनदार श्री.शुकूर गैबी, सर्व पदाधिकारी, प्राचार्य श्री.एच.जी.शेख, पर्यवेक्षक श्री. एस .ए .पटेल, सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व पालक यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले व पुढील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

Total Visitor Counter

3486538
Share This Article