GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी एमआयडीसीत पैशाच्या वादातून दोन गटात जोरदार हाणामारी; डोक्यात रॉड घालून केले रक्तबंबाळ, परस्परविरोधी गुन्हे

Gramin Varta
532 Views

रत्नागिरी : एमआयडीसी परिसरातील किया शोरूमसमोर पैशाच्या देवाणघेवाणीवरून दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना मंगळवारी घडली. भररस्त्यात झालेल्या या प्रकारामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या भांडणात स्टील रॉडचा वापर झाल्याने एका तरुणाला डोक्याला गंभीर दुखापत होऊन तो रक्तबंबाळ झाला.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कामगार विनोद मदकवी आणि ऋतिक वेदरे यांच्यात पैशाच्या व्यवहारावरून वाद झाला होता. हा वाद मिटवण्यासाठी दोन्ही गट एकत्र आले होते. मात्र, समेट होण्याऐवजी वाद वाढत गेला आणि त्याचे रूप थेट हाणामारीत झाले.
या घटनेनंतर रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात दोन्ही गटांकडून एकमेकांविरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. एका तक्रारीनुसार, भांडण सोडवताना मध्ये पडलेल्या व्यक्तीवर स्टील रॉडने हल्ला करण्यात आला तसेच जिवे मारण्याच्या धमक्याही देण्यात आल्या. तर दुसऱ्या गटाने दिलेल्या तक्रारीतही आपल्यावर रॉडने मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या तक्रारीनुसार परस्परविरोधी गुन्हे दाखल केले असून, भारतीय न्यायसंहिता 2023 मधील संबंधित कलमान्वये पुढील तपास सुरू आहे.

Total Visitor Counter

3367221
Share This Article