मकरंद सुर्वे / संगमेश्वर
संगमेश्वर तालुक्यातील शास्त्रीपूल–आंबेड मार्गावर डिंगणी–करजुवे दिशेने वळवताना बारा चाकी ट्रक चिखलात रुतल्याने मुख्य रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे.
या घटनेमुळे शास्त्रीपूल–डिंगणी–फुणगूस पुलामार्गे गणपतीपुळे आणि जयगड दिशेकडे जाणारी वाहतूक पूर्ण ठप्प झाली आहे. वाहनचालकांना राष्ट्रीय महामार्गावरूनच मार्ग बदलावा लागत आहे.
चिखलात अडकलेल्या या जड वाहनामुळे स्थानिक प्रवासी व वाहनचालकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. ट्रक बाहेर काढण्यासाठी जेसीबीच्या सहाय्याने प्रयत्न सुरू असून, वेळेत यश मिळाले नाही तर कोंडये, डिंगणी, करजुवे या मार्गांवरील एसटी बससेवेलाही अडथळा येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ट्रक चिखलात अडकला ; शास्त्रीपूल–डिंगणी रस्ता ठप्प
