रत्नागिरी : माहेरी गेलेल्या दुसऱ्या पत्नीला भेटण्यासाठी वारंवार जात असल्याचा राग मनात धरून तिघांनी एका पुरुषाला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची दुसरी पत्नी कौटुंबिक वादामुळे माहेरी गेली होती. बुधवारी (ता. २४) सायंकाळी एमआयडीसी रेल्वे ब्रीज परिसरातील वर्कशॉपमध्ये हे तिघेजण आले. “तुमचा आता संबंध संपलेला आहे, मग आमच्या मुलीला का त्रास देतोस?” असे म्हणत त्यांनी फिर्यादी यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यातील एका संशयिताने वर्कशॉपमधील पाईपने फिर्यादी यांच्या डाव्या कुशीवर प्रहार केला. या मारहाणीमुळे त्यांना दुखापत झाली. शिवीगाळ करत तिघांनी ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीने पोलिसांत सांगितले.
या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात तिघा अनोळखी संशयितांविरुद्ध मारहाण, धमकी आणि संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
माहेरी गेलेल्या दुसऱ्या पत्नीला भेटण्यासाठी वारंवार जात असल्याचा रागातून मारहाण, तिघांवर गुन्हा
