मकरंद सुर्वे / संगमेश्वर : तालुक्यातील बुरंबी येथील प्रतिष्ठित ग्रामस्थ मधुकर तथा आप्पा शंकर रजपूत यांचे अल्पशा आजाराने त्यांचे त्यांच्या राहत्या घरी निधन झाले.मृत्यू समयी ते ७६ वर्षाचे होते.
आप्पा शासकीय कर्मचारी होते. ते महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातुन निवृत्त झाले होते. गेले वर्षभर ते आजारी होते. आप्पा हे मनमिळावू, मितभाषी, परोपकारी,व आध्यात्माची आवड असल्याने त्यांची त्यांचा सर्वांशी चांगले संबंध होते. त्यांना सर्व प्रेमाने आप्पा म्हणायचे. र. जि. म. बँक शाखा संगमेश्वर येथील व्यवस्थापक रवींद्र रजपूत यांचे वडील. आप्पाच्या पश्चात ३मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार असून आप्पा जाण्याने कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. उत्तरकार्य रविवार दि. २० जुलै burambi(संगमेश्वर)येथे होणार आहे.