GRAMIN SEARCH BANNER

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह इमारत प्रवेश सोहळा

रत्नागिरी: गयाळवाडी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह इमारत प्रवेश सोहळा आज सहाय्यक आयुक्त दीपक घाटे, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, संशोधन अधिकारी शीतल सोनटक्के, एचडीएफसी बँकेचे शाखाधिकारी रामकृष्ण सावंत यांच्या उपस्थितीत आज झाला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. यावेळी झालेल्या कार्यक्रमात श्री. सातपुते, श्री. घाटे, श्रीमती सोनटक्के, श्री. सावंत आणि जागा मालक प्रसाद शारबिर्दे यांनी यावेळी शुभेच्छा व्यक्त केल्या. गृहपाल रविंद्र कुमठेकर यांनी स्वागत प्रस्ताविक केले. यावेळी अधिकारी, कर्मचारी, समतादूत उपस्थित होते.

Total Visitor Counter

2474945
Share This Article