रत्नागिरी : तालुक्यातील गावडेआंबेरे येथे खाडीत बुडून एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी घडली. जिलानी जितेंद्र डोर्लेकर (वय ४३, रा. गावडेआंबेरे, रत्नागिरी) असे मृत महिलेचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जिलानी डोर्लेकर या २६ ऑगस्ट रोजी खाडीच्या पाण्यात कालवे (एक प्रकारचे कवच) काढण्यासाठी गेल्या होत्या. त्याचवेळी, खोल पाण्यात त्यांचा तोल जाऊन त्या बुडाल्या आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद पूर्णगड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.
रत्नागिरी : गावडेआंबेरे येथे खाडीत कालवे काढण्यासाठी गेलेल्या महिलेचा बुडून मृत्यू
