GRAMIN SEARCH BANNER

देवरुख : पैशासाठी बापाच्या मानेवर सुरा ठेवणाऱ्या नराधम मुलाला 3 दिवसांची पोलिस कोठडी

Gramin Varta
243 Views

संगमेश्वर : ८० वर्षीय वडिलांचे पैशासाठी अपहरण करून त्यांचे तोंड बांधून अपहरण करणाऱ्या नराधम मुलालाअंगळवारी चिपळूण पोलिसांनी गजाआड केले होते. देवरुखातून पतीचे अपहरण करणाऱ्या मुलाबाबत आईने पोलिसात फिर्याद दिली होती. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला होता. चिपळूण पोलिसांनी मंगळवारी दुपारी 3.30 वाजता त्याला ताब्यात घेऊन देवरुख पोलिसांच्या ताब्यात दिले होते. देवरुख पोलिसांनी श्रीकांत दत्तात्रय मराठे (वय ४५, रा. चोरप-या, ता. संगमेश्वर) याला आज देवरुख न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 3 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

श्रीकांत याने आपल्या वडिलांचे मंगळवारी पहाटेच्या सुमारास अपहरण केले होते. त्याने आपल्या जन्मदात्या वडिलांना पैशासाठी मानेवर सुरा ठेवून पळवून नेले आणि नंतर व्हॉटसअॅपवर हात-तोंड बांधलेला फोटो पाठवून एक लाख रुपयांची खंडणी मागितली.

या प्रकाराची देवरूख पोलीस ठाण्यात तक्रार त्याच्या आईने सौ. सुनिता दत्तात्रय मराठे (वय ७४) यांनी दाखल केली होती. त्यांच्या दिलेल्या फिर्यादीवरून संपूर्ण प्रकरणाचा धक्कादायक उलगडा झाला आहे. सेवानिवृत्त शिक्षक दत्तात्रय मराठे (वय ८०) यांना पेन्शन मिळते. पैशाच्या मागणीवरून वारंवार वाद घालणारा मुलगा श्रीकांत याने सोमवारी रात्री ११ वाजता घरातच थरार माजवला.

आई आणि नातीसमोरच सुराने वडिलांच्या मानेवर धाक दाखवत, “आता एक लाख रुपये द्या नाहीतर ठार मारतो” अशी धमकी दिली. वडिलांना जबरदस्ती कपडे घालून टू-व्हिलरवर बसवून सह्याद्रीनगरच्या दिशेने पळून गेला.

पहाटेपर्यंत काहीच संपर्क न झाल्याने कुटुंब चिंतेत असतानाच सकाळी नात वेदांगीच्या मोबाईलवरून अपहरण झालेल्या वडिलांच्या मोबाईलवरून व्हॉटसअॅप कॉल आला.
त्यात वडिलांचा हात-पाय आणि तोंड प्लॅस्टिक टेपने घट्ट बांधलेला फोटो पाठवला. श्रीकांतने त्या फोटोसोबत एक लाख रुपये खंडणी मागितली आणि नकार दिल्यास “मी आता मागे हटणार नाही” अशी धमकी दिली.

या घटनेनंतर आई सुनिता मराठे यांनी धाडस दाखवत थेट देवरूख पोलीस ठाणे गाठले आणि मुलाच्या विरोधात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी तत्पर कारवाई करत चिपळूण परिसरातून श्रीकांत मराठेला ताब्यात घेतले. त्याच्यावर गुन्हे दाखल करून आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 3 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली

Total Visitor Counter

2645210
Share This Article