जाकादेवी /संतोष पवार : रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या जाकादेवी येथील तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालय व बाबाराम पर्शराम कदम कनिष्ठ महाविद्यालयात गुरुवार दि. १७ जुलै रोजी विविध शैक्षणिक दाखल्यांचा कॅम्प रत्नागिरी तालुक्याचे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न होणार आहे.
विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी आवश्यक असलेले महत्वपूर्ण दाखले या कॅम्पमध्ये घेण्यात येणार आहे . यामध्ये राष्ट्रीयत्व ( वयअधिवास )दाखला, उत्पन्न दाखला नॉन क्रिमिलेअर तसेच जातीचा दाखला देण्यात येणार आहेत.यासाठी विद्यार्थी व पालक यांनी संबंधित दाखल्यांसाठी आवश्यक कागदपत्रे सदर कॅम्पमध्ये सादर करावीत. कॅम्पमध्ये प्रत्यक्ष तहसीलदार उपस्थित राहणार असल्याने ज्या ज्या विद्यार्थी व पालकांना जे जे शैक्षणिक दाखले पाहिजे आहेत, अशा विद्यार्थी व पालकांनी १७ जुलै रोजी जाकादेवी विद्यालयाच्या सभागृहात सकाळी ११ वा.उपस्थित राहण्याचे आवाहन मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन उर्फ बंधू मयेकर यांनी केले आहे. हा कॅम्प यशस्वी करण्यासाठी तहसील कार्यालय रत्नागिरी,तलाठी कार्यालय खालगांव तसेच जाकादेवी महा ई सेवा केंद्र ,गणेश कॉम्प्युटर जाकादेवी यांचे विशेष मार्गदर्शन व सहकार्य मिळणार आहे. या कॅम्पचा लाभ जाकादेवी खालगाव परिसरातील अनेक गावांतील विद्यार्थ्यांना होणार आहे.