GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरीतील प्रसिद्ध उद्योजक गौरांग आगाशे यांना न्यू जेन आयकॉन पुरस्कार प्रदान

Gramin Search
6 Views

रत्नागिरी : टॅली एमएसएमइ सन्मान पुरस्कार २०२५ मध्ये रत्नागिरीतील प्रसिद्ध उद्योजक गौरांग आगाशे यांना न्यू जेन आयकॉन पुरस्कार प्रदान करण्यात आला.  त्यांना  अनबॉक्स  युवर डिझायर  या रत्नागिरी मधील फूड डिलिव्हरी व्यवसायाकरिता हा पुरस्कार देण्यात आला. गौरांग आगाशे यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल रत्नागिरीतील उद्योगक्षेत्रातून गौरांग आगाशे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

यावर्षी, पाचवा टॅली एमएसएमइ पुरस्कार समारंभ हॉटेल सहारा स्टार मुंबई येथे झाला. प्रतिवर्षी टॅली सोल्युशन्स ही बंगलोर स्थित व्यवसाय नियोजन सॉफ्टवेअर उद्योगामध्ये अग्रगण्य व टॅली या सुपरिचित आणि सर्व क्षेत्रात वापरल्या जाण्याऱ्या सॉफ्टवेअर साठी प्रसिद्ध कंपनी टॅली एमएसएमइ सन्मान सोहळा आयोजित करत असते. २५ लाखांहून जास्त टॅली वापरकर्ते,  एमएसएमइ नोंदणीकृत व्यवसायामधून नामनिर्देशन केले जाते. एकूण पाच श्रेणी याकरिता निश्चित करणेत आल्या आहेत.

बिझिनेस माइस्ट्रो , वंडर वूमन , न्यू जेन आयकॉन , टेक ट्रान्सफॉर्मर व चॅम्पियन ऑफ कॉज. महाराष्ट्रामधून सर्व  क्षेत्रातून काही हजार नामनिर्देशने विविध श्रेणीमध्ये करणेत आली होती. रत्नागिरीमधील टॅली थ्री -स्टार सर्टिफाईड पार्टनर होरायझन टेक्नॉलॉजीज यांचेकडून रत्नागिरी जिल्ह्यांमधून मधून विविध उद्योजकांना त्यांचे नामनिर्देशन करणेसाठी सुचविणेत आले होते.

प्रत्येक व्यवसायाच्या केंद्रस्थानी एक शक्तिशाली कथा आहे ,अनिश्चिततेत धैर्य, आव्हानांमधून धैर्य, आणि अपयश न मानणारी महत्त्वाकांक्षा असलेल्या उद्योजकांच्या प्रयत्न आणि यशाला  एक व्यासपीठ उपलब्ध करून एमएसएमइ मार्गक्रमणाला मान्यता देण्याचा एक मार्ग म्हणून सुरू झालेला हा उपक्रम आज एका चळवळीमध्ये रूपांतरीत झाला आहे. या चळवळीच्या माध्यमातून ज्यांना त्यांच्या व्यवसाय समुदायात बदल निर्माण करत, नेतृत्व करत, आणि प्रेरणा देण्याचे धाडस आहे, त्यांच्यासाठी हे एक लॉन्चपॅड आहे .भारत, मध्य पूर्व, आफ्रिका, बांगलादेश, आणि नेपाळमध्ये, हा सन्मान  दिला जातो, जे व्यवसाय अडथळे झुगारतात, विपरीत परिस्थितीला आव्हान देतात, सर्वसाधारण प्रमाणके बदलण्याचा धीराने प्रयत्न करून यशस्वी होतात आणि व्यवसाय करण्याला एक नवा अर्थ देतात अशा उद्योजकांना हा पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. प्रथम व्यवसाय सुरु करणाऱ्या संस्थापकापासून ते अनुभवी उद्योजकांपर्यंत सर्व विजेत्यांमध्ये एक गोष्ट समान असते ती म्हणजे त्यांनी सुरुवात करण्याचे धाडस केले ज्यामुळे त्यांचा उद्योग जगतातील प्रवास सुकर झाला आहे.

Total Visitor Counter

2648006
Share This Article