रत्नागिरी: कोकण रेल्वे मार्गावरील उधना जंक्शन – मंगळुरू जंक्शन – उधना जंक्शन या अर्धसाप्ताहिक विशेष एक्स्प्रेस गाडीला सप्टेंबरअखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
पश्चिम आणि दक्षिण भारतादरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. आता ही गाडी (क्र. 09057 / 09058) येत्या 28 सप्टेंबरपर्यंत जाणार आहे ही विशेष एक्स्प्रेस तिच्या पूर्वीच्याच रचनेसह आणि वेळेनुसार धावत राहणार आहे,
गणेशोत्सव, दिवाळी, ख्रिसमस किंवा उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसारख्या सणाच्या आणि सुट्ट्यांच्या काळात प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढते. अशा वेळी या विशेष गाडीच्या फेऱ्या वाढवल्याने अतिरिक्त प्रवासाचा पर्याय उपलब्ध होईल. त्यामुळे प्रवासाचे नियोजन करणे अधिक सोपे होणार आहे.
उधना, सुरत आणि त्या आसपासच्या परिसरातून कोकणासह मंगळुरू आणि कर्नाटकच्या इतर भागांत जाणाऱ्या तसेच मंगळुरू येथून उत्तर दिशेला प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा फायदा होईल. व्यावसायिक, विद्यार्थी, पर्यटक आणि नातेवाईकांना भेटायला जाणाऱ्या सर्वांसाठी ही एक महत्त्वाची सुविधा आहे. यामुळे प्रवासाचा ताण कमी होऊन अधिक आरामदायी प्रवास अनुभवता येईल.
रत्नागिरी: उधना-मंगळुरू एक्स्प्रेसच्या फेऱ्यांना तीन महिने मुदतवाढ
