GRAMIN SEARCH BANNER

सावर्डे बाजारपेठेत भरधाव चारचाकीची उभ्या कारला धडक; गुन्हा दाखल

Gramin Search
7 Views

चिपळूण: चिपळूण तालुक्यातील सावर्डे बाजारपेठ येथील गोवा ते मुंबई जाणाऱ्या सर्विस रोडवर शुक्रवारी (५ जुलै ) रात्री ८.२५ वाजण्याच्या सुमारास एका अपघातात भरधाव होंडा जॅझ गाडीने उभ्या असलेल्या मारुती सुझुकी बलेनो झेटा गाडीला जोरदार धडक दिली. या अपघातात होंडा जॅझचा चालक किरकोळ जखमी झाला असून, सावर्डे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रसन्न गंगाराम जोशी (वय ४४, रा. शिवडेवाडी, दहिवली बुद्रुक, ता. चिपळूण) यांनी त्यांची मारुती सुझुकी बलेनो झेटा गाडी (एमएच/एन/९३४८) सावर्डे बाजारपेठेतील सर्विस रोडवर सुरक्षितपणे पार्क केली होती. त्याचवेळी, मनीष मनोहर कदम (वय १९, रा. विलेपार्ले ईस्ट, मुंबई) हा त्याच्या ताब्यातील होंडा जॅझ गाडी (एमएच ०४/ईएफ/७१८९) गोवा बाजूकडून मुंबईकडे भरधाव वेगात घेऊन येत होता.

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, मनीष कदमने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून निष्काळजीपणे वाहन चालवले. यामुळे त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि त्याने सर्विस रोडवर उभ्या असलेल्या प्रसन्न जोशी यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की, दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले. या अपघातात होंडा जॅझचा चालक मनीष कदम याला किरकोळ दुखापत झाली आहे.
या प्रकरणी सावर्डे पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री ११.१० वाजता भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम २८१, १२५ (अ) आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे सावर्डे बाजारपेठेतील वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Total Visitor Counter

2649063
Share This Article