रत्नागिरी: महाराष्ट्र राज्य परिवहन मार्ग महामंडळाच्या वतीने यंदाच्या वर्षी पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना एसटी पास थेट शाळेत वितरीत करण्यात येत आहेत. 16 जूनपासून ही मोहिम सुरू झाली असून 9 आगारातून अवघ्या 15 दिवसात अहिल्याबाई होळकर योजनेतून तब्बल 25 हजार विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला असल्याची माहिती वाहतूक नियंत्रक सचिन सुर्वे यांनी दिली.
यापूर्वी शहरासह ग्रामीण भागातील मुले-मुली एसटी बसस्थानकातून पासेस घेत होते. पासेससाठी मोठ्या प्रमाणात रांगा लावत होत्या. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अडचण येत होती. यासर्वांची अडचण ओळखून महाराष्ट्र राज्य परिवहन मार्ग महामंडळाच्या वतीने पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना एसटीचा पास थेट शाळेत वितरण करण्याचे आदेश दिले होते.
मुलींमध्ये शिक्षणाची ओढ निर्माण व्हावी, प्रत्येक क्षेत्रात मुलांच्या बरोबरीने पाऊल घट्ट करावे यासाठी बहुजन हिताय, बहुजन सुखाय हे ब्रीद वाक्य घेवून एसटी विभाग प्रवासी सेवा केली जात आहे. त्यामुळे 16 जूनपासून एसटीचे अधिकारी, कर्मचारी विविध शाळा, महाविद्यालयात मुलींना पासचे वितरण केले. मुलींसाठी त्रेमासिक, मुलांसाठी मासिक कालावधीसाठी पासेस दिले जात आहे. ज्या ज्या शाळा महाविद्यालयांनी पासेसची मागणी केली त्यांना एसटी कर्मचार्यांनी स्वता शाळेत जाऊन पासेसचे वितरण केले.
दरम्यान, महाविद्यालयातील विद्यार्थी, सवलत नसलेल्यांनी रांगेत उभे राहून पासेस काढली आहेत. अशा विद्यार्थ्यांना पासेस देण्याची सोय महाविद्यालयात करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांमधून होत आहे.
बालाजी आडसुळे, आगार व्यवस्थापक, रत्नागिरीपुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेतून हजारो पासेस वाटप थेट शाळेत जाऊन करण्यात आले आहे. काही सवलतीचे पासेस मुलांना देण्यात आले आहे. ज्या शाळांना पासेसची आवश्यकता आहे. त्यांनी मागणी करावी. त्यांना पासेस देण्यात येतील.
रत्नागिरी जिल्ह्यात जूनअखेर 25 हजार मुलींना पास वाटप
