जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी कसबा संघाची निवड
संगमेश्वर/प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक संचालनालय, पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ३ ऑक्टोबर २०२५ रोजी न्यू इंग्लिश स्कूल, देवरूख येथे १९ वर्षांखालील वयोगटातील तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेमध्ये संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी, कसबा संचलित न्यू इंग्लिश हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, कसबा संगमेश्वर येथील १९ वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांचा संघ सहभागी झाला होता.
कसबा हायस्कूलच्या मुलांच्या संघाने उत्तुंग खेळ कौशल्य दाखवत सर्व सामने जिंकून स्पर्धेमध्ये अभूतपूर्व यश संपादन केले. उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर कसबा हायस्कूलच्या संघाने तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत दणदणीत विजय मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे.
या विजयामुळे आता कसबा हायस्कूलचा १९ वर्षांखालील मुलांचा संघ जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत संगमेश्वर तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.
शाळेच्या परंपरेला साजेसा हा विजय मिळवत विद्यार्थ्यांनी शाळेचे आणि संस्थेचे नाव तालुक्यात पुन्हा एकदा उज्ज्वल केले आहे.
खो-खो संघातील विजयी खेळाडू आणि मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन संस्था अध्यक्ष कॅप्टन अकबर खलपे, उपाध्यक्ष श्री. नियाज कापडी, उपाध्यक्ष श्री. इब्राहिम काझी, सचिव श्री. सईद उपाद्ये, सहसचिव श्री. शौकतअली खलफे, खजिनदार श्री. शिकुर गैबी, सर्व सदस्य, प्राचार्य श्री. एच.जी. शेख, पर्यवेक्षक श्री. एस.ए. पटेल, मार्गदर्शक शिक्षक श्री. पी.जी. पडवळ व श्री. यु.टी. गावडे, सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक यांच्या वतीने करण्यात आले. तसेच जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी संघाला हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
संगमेश्वर तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत कसबा हायस्कूलचे विद्यार्थी अजिंक्य
