मुंबई: रेल्वे मंत्रालयांतर्गत रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड्स (आरआरबी) मध्ये ३० विभागातील एकूण ६,२३८ ‘टेक्निशियन’ रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात २७ जून २०२५ रोजी जाहीर झाली होती.
( I) टेक्निशियन ग्रेड- I सिग्नल – एकूण १८३ पदे (माजी सैनिक – १९ पदे, अपंग – १२ पदे कॅटेगरी LD साठी राखीव).
रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड ( RRB), मुंबई अंतर्गत एकूण रिक्त पदे – ३९ ( CR – १३, WR – २६). पात्रता – बी.एस्सी. (फिजिक्स/इलेक्ट्रॉनिक्स/कॉम्प्युटर सायन्स/इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी/ इन्स्ट्रूमेंटेशन या विषयांसह उत्तीर्ण किंवा एकत्रितपणे यापैकी विषयांसह उत्तीर्ण किंवा वरीलपैकी विषयांसह किंवा एकत्रितपणे यापैकी विषयांसह ३ वर्षं कालावधीचा इंजिनीअरिंग डिप्लोमा किंवा पदवी.
( II) ( अ) टेक्निशियन ग्रेड- III (ओपन लाइन) – एकूण ६,०५५ पदे (माजी सैनिक – ६०५ पदे, अपंग – ३३१ पदे कॅटेगरी LD – ५०, VI – ११४, HI – ११६, MD – ५१ पदे राखीव). (वेतन श्रेणी – लेव्हल-२ (१९,९००) अंदाजे वेतन दरमहा रु. ३८,३००/-).
( RRB), मुंबई अंतर्गत एकूण रिक्त पदे (कॅटेगरी २ ते ४, ६ ते १३, १५ ते १८, २३, २४, २६ ते २८ आणि ३०) – ८५२ (माजी सैनिक – ८८, अपंग – ४९ (कॅटेगरी VI = १३, HI – १३, LD – ११ आणि MD – १२ साठी पदे) राखीव.
पात्रता – ( ८ जुलै २०२५ रोजी) १० वी आणि संबंधित ट्रेडमधील आयटीआय किंवा १० वी आणि संबंधित ट्रेडमधील अॅक्ट अॅप्रेंटिसशिप पूर्ण.
ट्रेडनुसार RRB मुंबई अंतर्गत टेक्निशियन ग्रेड- III मधील रिक्त पदांचा तपशील – सुरुवातीला पदाचा कॅटेगरी नंबर दिलेला आहे.
(२) ट्रक मशिन – ७ पदे ( WR – ७).
(३) ब्लॅकस्मिथ – २२ पदे (CR – ४, WR – १८) .
(४) ब्रिज (फिटर/फिटर स्ट्रक्चरल/ वेल्डर) – ६ पदे ( WR – ६).
(६) डिझेल इलेक्ट्रिकल – १ पद (WR – १) (ईडब्ल्यूएस).
(७) डिझेल मेकॅनिकल – ३ पदे ( WR – ३).
(८) इलेक्ट्रिकल/ TRS – १४९ पदे (CR – ८९ , WR – ६०).
(९) इलेक्ट्रिकल / GS (इलेकट्रिशियन/वायरमन/मेकॅनिक- HT, LT इक्विपमेंट्स अँड केबल जॉईंटर/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक) – ३३ पदे ( CR – ४, WR – २६, SCR – ३).
(१०) इलेकट्रिकल ( TRD) (इलेकट्रिशियन/वायरमन/मेकॅनिक (HT, LT)/इक्विपमेंट्स अँड केबल जॉईंटींग/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक) – ३७ पदे ( CR – १, WR – ३६)
(११) ईएमयू (इलेक्ट्रिशियन/ वायरमन/इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/ मेकॅनिक पॉवर इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिक – HT, LT इक्विपमेंट्स अँड केबल जॉईंटर/फिटर/वेल्डर/पेंटर जनरल/ मशिनिस्ट/कारपेंटर/ऑपरेटर अॅडव्हान्स मशिन टूल) – ७० पदे ( WR – ७०).
(१२) फिटर ( OL) (फिटर) – ६५ पदे ( CR – ३०, SCR – ७, WR – २८ पदे माजी सैनिकांसाठी राखीव) (७ पदे अपंगांसाठी राखीव).
(१३) रेफ्रिजरेटर अँड ए.सी. (रेफ्रिजरेटर अँड ए.सी. मेकॅनिक/ इलेक्ट्रिशियन/वायरमन/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक)-३३ पदे (CR -७, WR – २६)
(१५) एस अँड टी (इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/इलेक्ट्रिशियन/वायरमन/१२ वी (फिजिक्स आणि मॅथ्स)) – ८५ पदे ( CR – २५), SCR – २, WR – ५८).
(१६) वेल्डर ( DL) (वेल्डर/वेल्डर गॅस अँड इलेक्ट्रिक/गॅस कटर/वेल्डर स्ट्रक्चरल/वेल्डर पाईप/वेल्डर TIG/ MIG) – ३३ पदे (CR – १६, WR – १७
(१७) क्रेन ड्रायव्हर (मेकॅनिक मोटर वेहिकल/मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट कम ऑपरेटर/क्रेन ऑपरेटर/ऑपरेटर लोकोमोटिव्ह अँड रेल क्रेन्स) – ३ पदे ( WR)
(१८) कारपेंटर (वर्कशॉप) (कारपेंटर/फर्निचर) – ६ पदे ( CR)
(२३) फिटर ( PU WS) (मेकॅनिकल) – २४० पदे ( CR – ६७, WR – १७३)
(२४) मशिनिस्ट (वर्कशॉप) (मशिनिस्ट/टर्नर/मशिनिस्ट-ग्राईंडर/ऑपरेटर अॅडव्हान्स्ड् मशिन टूल्स) – ११ पदे ( CR – ५, WR – ६)
(२६) मिल राईट ( DU WS) – २ पदे ( WR).
(२७) पेंटर (वर्कशॉप) – २ पदे (CR)
(२८) ट्रिमर (वर्कशॉप) – २ पदे ( CR)
(३०) वेल्डर (वर्कशॉप) – ४० पदे ( CR – १८, WR – २२) .
टेक्निशियन ग्रेड- III पदांसाठी
पात्रता – (दि. २८ जुलै २०२५ रोजी) १० वी आणि संबंधित ट्रेडमधील आयटीआय किंवा १० वी आणि संबंधित ट्रेडमधील अॅक्ट अॅप्रेंटिसशिप पूर्ण.
पद क्र. १५ एस अँड टी साठी बारावी फिजिक्स आणि मॅथ्स विषयांसह उत्तीर्ण उमेदवारसुद्धा अर्ज करण्यास पात्र आहेत.
वयोमर्यादा – (दि. १ जुलै २०२५ रोजी) टेक्निशियन ग्रेड- I सिग्नल – १८ ते ३३ वर्षे
निवड पद्धती – (१) कॉम्प्युटर आधारित टेस्ट, (२) कागदपत्र पडताळणी, (३) मेडिकल एक्झामिनेशन.
RRB मुंबईमधील पदांसाठी ऑनलाइन अर्ज www. rrbmumbai. gov. in या वेबसाइटवर दि. २८ जुलै २०२५ (२३.५९ वाजे) पर्यंत करावेत.
नोकरीची संधी : रेल्वेत ‘टेक्निशियन’ पदे
