तुषार पाचलकर / राजापूर
पाचल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सरस्वती विद्यामंदिर, पाचल या शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी राज्य शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे.
इयत्ता पाचवीतील मृणाल रवींद्र पांचाळ हिने 300 पैकी 226 गुण मिळवून जिल्हा गुणवत्ता यादीत ५२ वा क्रमांक पटकावला आहे. ईश्वरी देविदास चव्हाण हिने 300 पैकी 224 गुण मिळवून जिल्हा गुणवत्ता यादीत ६१ वा क्रमांक पटकावला आहे. ताबीस सजागत रोगणकर याने जिल्हा गुणवत्ता यादीत ७० वा क्रमांक मिळवला आहे. कुंजल विनायक सक्रे हिला जिल्हा गुणवत्ता यादीत ८७ वा क्रमांक मिळाला आहे.
इयत्ता आठवीतील सार्थक रामजी आगटे याने राष्ट्रीय गुणवत्ता यादीत १० वा क्रमांक पटकावला आहे. सोहम श्रीकांत मुंडे याला जिल्हा ग्रामीण गुणवत्ता यादीत ३७ वा क्रमांक मिळाला आहे. स्वराज धनाजी भोसले याला ४१ वा क्रमांक, आश्लेषा विशाल घोलप हिला ५० वा क्रमांक, नंदिनी प्रवीण केंदळकर हिला २१ वा क्रमांक आणि वैदही युवराज भंडारी हिला ८८ वा क्रमांक प्राप्त झाला आहे.
या यशामागे विद्यार्थ्यांची मेहनत, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य कारणीभूत आहे. शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि संस्था चालक मंडळाकडून सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले असून त्यांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.