GRAMIN SEARCH BANNER

120 व्या वर्धापनदिनानिमित्त बँक ऑफ इंडिया सावर्डे येथे विविध कार्यक्रम

Gramin Varta
88 Views

संदिप घाग / सावर्डे
बँक ऑफ इंडिया च्या 120 व्या वर्धापनदिनानिमित्त सावर्डे शाखेत दि. 07.09.2025 रोजी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आला होते. शाखेत येणार्‍या प्रत्येक ग्राहकाला गुलाबाचे फुल आणि मिठाई देऊन स्वागत करण्यात आले  तसेच बॅंकेच्या विविध योजने अंतर्गत कर्जदारांना मंजुरी पत्र देण्यात आले. शाखेतर्फे रक्तदानाचे महत्व लोकाना समजावे म्हणून रक्तदान शिबीर देखील आयोजित करण्यात आले होते. प्रसिद्ध उद्योजक श्री सचिन पाकले यांनी शाखेला भेट देऊन कौतुक केले व स्वतः रक्तदान केले. माननीय आमदार श्री शेखर निकम यांनी शाखेला भेट दिली व शाखेच्या कार्याबद्दल कौतुक केले तसेच शाखेच्या प्रगती साठी शाखा व्यवस्थापक श्री तुषार वाघमारे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

कार्यक्रमाला सचिन कोल्हापुरे, अमित सुर्वे, सुयोग खेडेकर, रविंद्र सुर्वे, डॉ विक्रमसिंह खोत, डॉ चंद्रकांत पाटील, देवराज गरगते व अन्य मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वरीष्ठ व्यवस्थापक श्री तुषार वाघमारे, सुधाशु साहू,  अनुराग रहाते,आशिष मेश्राम, चंदन मिश्रा, मंगेश बांद्रे, किशोर यादव, अखिल राज आदींनी परिश्रम घेतले

Total Visitor Counter

3378949
Share This Article