GRAMIN SEARCH BANNER

ब्रेकिंग : रत्नागिरी-गणपतीपुळे मार्गावर निवळी येथे टँकर पलटी

Gramin Varta
17 Views

रत्नागिरी: रत्नागिरी-गणपतीपुळे मार्गावर निवळी येथे आज सकाळी  ६ वाजण्याच्या सुमारास गॅस टँकर पलटी झाल्याने खळबळ उडाली. सुदैवाने या अपघातात कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही, मात्र टँकरचा चालक जखमी झाला असून त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जयगड येथून बेंगलोरला जाणारा गॅस टँकर निवळी गणपतीपुळे रोड नजीक उलटला. सुदैवाने गॅस गळतीचा  कोणताही धोका नाही आहे असे प्रशासनाकडून माहिती देण्यात आलेली आहे. ही घटना सोमवारी सकाळी सहा वाजण्याचा सुमारास घडली असून या ठिकाणी तत्काळ ग्रामीण पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव हे आपल्या टीमसह दाखल झाले असून या ठिकाणी वाहतूक देखील सुरळीत चालू आहे.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी तातडीने धाव घेतली आणि मदतकार्य सुरू केले. चालकाला जखमी अवस्थेत बाहेर काढून तातडीने जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. त्याच्या प्रकृतीबाबत अद्याप अधिक माहिती मिळू शकली नाही.

सुदैवाने या अपघातातून कोणतीही गॅस गळती झाली नाही. त्यामुळे मोठा धोका टळला.  या घटनेमुळे या मार्गावरील वाहतूक काही काळासाठी थांबवण्यात आली होती, मात्र आता ती पूर्ववत सुरू झाली

Total Visitor Counter

3217025
Share This Article