रॉग साईडने येणाऱ्या बोलेरोची पोलिस वाहनाला धडक; चालक घटनास्थळावरून फरार

saurabhsalvi26
881 Views

रत्नागिरी : रत्नागिरी-हातखंबा महामार्गावरील गयाळवाडी फाटा येथे भरधाव बोलेरो पिकअपने रॉग साईडने येत पोलिस वाहनाला धडक दिल्याची घटना घडली. अपघातानंतर बोलेरो चालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाल्याने पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. पोलीस मुख्यालयातील चालक नवनाथ विक्रम शेंडे (वय ३४) हे सरकारी वाहन (क्र. एमएच-०८/एएक्स-०५०१) घेऊन रत्नागिरी-हातखंबा मार्गावरून जात होते. गयाळवाडी फाटा येथील ‘रिलॅक्स बिअर शॉपी’समोर आल्यानंतर विरुद्ध दिशेने येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या बोलेरो पिकअपने वाहतुकीचे नियमांचे उल्लंघन करत निष्काळजीपणे वाहन चालवून सरकारी वाहनाच्या उजव्या बाजूस जोरदार धडक दिली.

या अपघातात सरकारी वाहनाचे नुकसान झाले. धडक दिल्यानंतर बोलेरो चालक न थांबता वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला.
याप्रकरणी नवनाथ शेंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम २८१ तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ व १३४(ब)/१७७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार चालकाचा शोध सुरू असून, पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Total Visitors :
4575639
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *