दापोली : तालुक्यातील देहेण येथील तळवटकरवाडी येथे २८ जुलै रोजी सकाळी १० वाजण्यापूर्वी एका ६६ वर्षीय वृद्धाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दारूच्या नशेत आणि एकटेपणाला कंटाळून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे.
दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देहेण तळवटकरवाडी येथील रहिवासी असलेले सदाशिव गुणाजी ठसाळ (वय ६६) यांनी आपल्या राहत्या घरातील माजघरात लाकडी भालाला नायलॉन दोरीने गळफास लावून घेतला. घटनेच्या वेळी ते दारूच्या नशेत होते आणि एकटेपणामुळे ते कंटाळले होते असे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
या घटनेची माहिती मिळताच, दापोली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात अकास्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.
सदाशिव ठसाळ यांच्या आत्महत्येमागे नेमके कोणते कारण होते, याचा दापोली पोलीस अधिक तपास करत आहेत.
दापोलीत एकटेपणाला कंटाळून वृद्धाची आत्महत्या
