GRAMIN SEARCH BANNER

ब्रेकिंग : चिपळुणात एका राजकीय नेत्याच्या मुलाने पादचाऱ्याला चिरडले; प्रौढाचा जागीच मृत्यू

चिपळूण (प्रतिनिधी) : चिपळुणात मुंबई-पुण्यासारख्या धक्कादायक ‘हिट अँड रन’ घटनांना सुरुवात झाल्याचा प्रकार बुधवारी काविळतली येथे घडला. एका rajkiy स्थानिक नेत्याच्या मुलाने भरधाव कारने एका प्रौढ पादचाऱ्याला जोरदार धडक दिली. या अपघातात रमेश कळकुट्टी (वय 50) यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर कारचालक पळून गेला असून घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी गर्दी केली.

या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. अपघातग्रस्ताला मदत करण्याऐवजी चालक पळ काढत असल्याने ‘नेत्यांच्या मुलांना कायद्याचा धाक नाही का?’ असा सवाल संतप्त नागरिकांनी उपस्थित केला आहे.

या अपघातामुळे कोकणातही बिनधास्त गाडी चालवण्याच्या प्रवृत्तीला खतपाणी मिळत असल्याची टीका होत आहे. पोलिसांनी आरोपी चालकाला तात्काळ अटक करावी, अशी मागणी होत असून, नागरिकांनी अपघातानंतर काही काळ रस्ता रोखून ठेवत निषेध व्यक्त केला.

या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

Total Visitor Counter

2455606
Share This Article